मला वाटलंच होतं की कोणीतरी ह्यावर टिप्पणी करणार. अधिष्ठान म्हणजे इंग्लिश मध्ये 'बेसिस', मराठी मध्ये आपण बैठक म्हणू. बौद्धिक अधिष्ठान म्हणजे बुद्धिची बैठक होऊ शकेल. मी तरी मराठी मध्ये बौद्धिक अधिष्ठान हा शब्दसमूह बऱ्याच वेळा ऐकला आहे/ वाचला आहे. त्यामुळे आपल्या प्रतिसादाचा रोख हा चेष्टेचा वाटत आहे. आपले मत स्पष्टपणे कळू द्यात.

'असे वाटते' बद्दल... आपण व्यक्त केलेली मतं ही आपली स्वतःची आहेत हे नम्रपणे सांगण्यासाठी वापरण्यात येणारा हा सर्वमान्य तोडगा आहे. नाहीतर उगाचच त्या विषयामध्ये पीएचडी केल्यासारखं स्वतःची मतं दुसऱ्याच्या डोक्यावर मारल्यासारखं होतं.