धीरजराव, तुम्ही भूषण यांचे मत विचारले असले तरी मला प्रतिसाद द्यावासा वाटला म्हणून लिहीतो आहे.

कॉलेज मध्ये असताना परभणी ला राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजतर्फे गेलो होतो. ४ दिवस राहिलो. मला परभणी शहर म्हणून मुळिच आवडले नाही. त्यात परभणी चा दोष नाही. भारतातली सर्वच छोटी शहरं मला खूप विचित्र वाटतात. त्याचं कारण म्हणजे मध्यम वर्गाचा अभाव. एकतर लोकं खूप गरीब तरी असतात किंवा मग बंगलेवाले. त्यामुळे वातावरण फारच दूषित वाटतं. नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद ही शहरं चांगली आहेत कारण मध्यमवर्ग बराच आहे. पण, जालना, परभणी, बीड, चंद्रपूर वगैरे हॉरिबल आहेत.

अवांतर: मराठी मध्ये हल्ली 'जी' लावायचं काय फॅड आलय? का शिवाजी, तानाजी तसं भुषणजी वगैरे? राव वापरा की राव  , बंगाली 'दा' देखिल जास्त जवळचं वाटतं.