मराठी माणसं धंदा करत नाहीत वगैरे आता फारच क्लिशे (cliche) वाटतं. माझ्या स्वतःच्या डायरेक्ट ओळखीमध्ये अशी कितीतरी मराठी कुटुंबं आहेत, कितीतरी मित्र आहेत ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. आणि ते तो वर्षानुवर्ष यशस्वीपणे चालवत आहेत. आता मोठे उद्द्योगपती नसतील पण म्हणून काय झालं. पण सार्वजनिक ठिकणी वावरताना विशेषतः परप्रांतियांसमोर न्यूनगंड असतो बऱ्यापैकी. आता अश्या विषयावरचा चित्रपट पाहून मी तरी फार टाळ्या वाजवेन असं मला आत्ता तरी वाटत नाहिये.