फक्त मराठी खेळ, क्रिकेट वर बहिष्कार असं म्हटलं का मी? आपला प्रतिसाद कदाचित दुसऱ्या चर्चेसाठी लागू होईल...
(चेंडुफळी नाही म्हणत.. बळेच करायचं म्हणून केलं असा होत कधी कधी इथे... )
मला एवढचं म्हणायचा आहे कि जे शब्द (मराठी शब्द) आपण नेहमी वापरतो, ते तरी वापरावेत.... नाहीतर काही वर्षांनी त्यांची पण अवस्था आपण उदाहरणादाखल दिलेल्या काही शब्दांसारखी होईल....फक्त क्रिकेटशी संबंधितच शब्द असं नाही. आज वर्गात मराठी शिकवताना सुद्धा फुल स्टॉप, कॉमा, सेमी कोलन म्हणतात... पूर्णविराम, अर्धविराम विसरून गेले आहेत कदाचित..