हा लेख मला मुळीच आवडलेला नाही. एखाद्या इंग्रजी लेखाचे भाषान्तर केल्यासारखा वाटतो.  यातले मराठी अत्यंत कृत्रिम आहे. मी जर लिहिला असता तर...बरेच व्यवस्थापक ( हा शब्द आवडत नसल्यास तो असा वाचा- मॅनेजर, बॉस, पी. एम. ) आपल्या कर्मचारींबद्दल काही खूणगाठी (अझंपशन) मनात ठेवतात. त्यांच्या ह्या त्या खूणगाठी काहींच्याबद्दल चांगल्या असतात तर काहिंच्याबद्दल चांगल्या नसतात. ऐवजी..बऱ्याच कंपनी-व्यवस्थापकांच्या मनात आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल विविध समजुती-गैरसमजुती असतात.

आपण चांगल्या नसलेल्या खूणगाठी व्यवस्थापकच्या मनात का निर्माण होऊ शकतात त्या एका शक्यतेबद्दल बघू. अशा समजुती आणि विशेषतः गैरसमजुती निर्माण होण्यास काय कारण असावे? खालील संवादावरून कदाचित या कारणमीमांसेचा थोडाफार बोध होऊ शकेल.

व्यवस्थापक (मनातला विचार): विनय हा एक फार आळशी माणूस आहे आणि त्याच्याकडून काम घ्यायचे असेल तर लक्ष द्यावे लागते तो करीत असलेल्या कामावर सतत लक्ष ठेवावे लागते.

व्यवस्थापकाची प्रतिक्रिया (बिहेवियर): मी विनयला मला जे हवे आहे ते नेमकेपणे सांगतो व तो ते करतो की नाही हे पाहतो व्यवस्थापकाची प्रतिक्रिया(रिस्पॉन्स): मला जे हवे आहे ते मी नेमकेपणे विनयला सांगतो आणि तो ते करतो की नाही हे पाहतो.

विनयचा दृष्टीकोन: माझा बॉस माझ्यावर एखाद्या पोलिसासारखे लक्ष देतो  विनयचा दृष्टिकोनः माझा बॉस माझ्यावर एखाद्या गुप्त पोलिसासारखी नजर ठेवतो.

वगैरे वगैरे.-

-अद्वैतुल्लाखान