उच्चशिक्षीत स्त्रीयांनी नोकरीच केली पाहिजे का? त्याशिवाय त्यांना मान (? ) मिळत नाही का ?
शिक्षणाचा उपयोग/ उपयुक्तता केवळ नोकरी केल्याने (किंवा पैसा कमावल्यानेच) होते का ? का यापेक्षा जास्त काही वेगळंसुद्धा करता येईल असं वाटत नाही.
मला तरी वाटते की जर पैसा कमवायचे दडपण नसेल तर आवडीचे काम अधिक चांगले करता येते. शिक्षण घेताना (विशेषतः लग्नाच्यावेळी) मुली स्वतःच्या काही आवडी-निवडी सांगतात, त्या पुढे खरच जोपासतात का ? जर जोपासत असतील तर हा प्रश्नच उद्भवत नाही. मी स्वतः एक पुरुष असून (आणि म्हणून पैसा कमवणे गरजेचे आहे म्हणुन) स्वतःच्या कामाव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी शिकलो. आज माझ्यासोबतची मंडळी संगणक आणि सॉफ्ट्वेअर याबाबत अनभिज्ञ आहेत तर मी "वासरात लंगडी गाय शहाणी" या प्रमाणे बराच पुढे गेलोय. जर ह्या गृहीणींना इतका वेळ असेल (कारण नोकरी करायला वेळ लागतोच ना ? ) तर त्या नवनवीन कौशल्य का शिकत नाहीत? केवळ पैसा कमावला म्हणजेच "महत्त्व" मिळते असं नाही.
बाकी अमेरिकेत काय कराव हे मी नाही सांगू शकणार, पण भारतात करण्यासारख्या खुप काही गोष्टी आहेत. तशीच जर तुमची इच्छा असेल तर त्याबद्दलही मी लिहेन.
धन्यवाद !
अवांतर :- मुखपृष्ठावर जसे मराठीत आहे, तसेच याही पृष्ठावर बदल करता येतील का ?