'मस' तला 'स' म्हणजे संकेतस्थळ असावे असा अंदाज आला होता, पण त्यावरचा अनुस्वार(खरे म्हणजे तर तिहेरी अनुस्वार--एक संकेतसाठी, दुसरा अनेकवचन म्हणून आणि तिसरा बोलीभाषेतला) उमटलेला नव्हता म्हणूनच आपल्याला पातालविजयम्मधील राक्षसाप्रमाणे हसायची संधी मिळाली. हल्ली अनुच्चारित अनुस्वारांसमवेत उच्चारितही जायला लागलेत असे विशेषतः पांढरपेशांच्या बोलीभाषेतले लिखाण वाचून वाटायला लागले आहे. म्हणजे सुक्याबरोबर ओलेही जळते तशातली गत! आपले पाहूनही हिंदीभाषकांनी त्यांच्या लिखाणातला एकही अनुस्वार गाळला नाही हे आश्चर्य नाही?
आपली जर यादी मानवी, जर मनोगतावरची काय संगणकनिर्मित असते? शक्य आहे, म्हणूनच अनेकदा तिच्यातल्या एखाद्या दुव्यावर टिचकी मारली तर आपण भलतीकडेच भरकटतो.