आपण असामान्य असणारच.  पण कधीकधी सामान्य नसणारी माणसे असामान्य नसून आणखी काहीतरी असतात, हेही लक्षात असावे. कशी ते स्पष्ट करायला नको.

उपपादन हा पूर्वी अनेक ग्रंथांमधून सररास वापरला जाणारा सौम्य शब्द. त्या जुन्या अर्थाप्रमाणे, प्रतिपादन म्हणजे आवेशयुक्त उपपादन. याउलट, 'विवेचना'त स्पष्टीकरणही अंतर्भूत होते.

खंडोबाचे भक्त एका ताटात पाने, सुपाऱ्या वगैरे भरतात, त्याला तळी भरणे म्हणतात.  म्हणजे ते कार्य करायला सर्व सामग्री जुळवून सर्वांनी सिद्ध होणे. तळी उचलणे म्हणजे एकदिलाने कार्य सिद्धीस नेणे. परंतु, एखाद्याची तळी उचलणे म्हणजे त्याचे काम व्हावे म्हणून, त्याची बाजू चुकीची असली तरी, त्याच्या होला हो देणे(होत हो मिसळणे).