मला मुदलातले सेल्फफुलफिलिंग प्रॉफेसी म्हणजे काय ते माहीत नाही आणि इतकी स्पष्टीकरणे वाचूनही ते समजलेले नाही. हा सद्गुण आहे की दुर्गुण? प्रॉफेसी म्हणजे भाकीत, म्हणजे भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टीसंबंधी वर्तवलेला अंदाज. मग या इंग्रजी शब्दाच्या मराठी अर्थामध्ये हा 'भविष्यकाळ' का डोकावत नाही? प्रतिपादन, खरे करणे, बत्तिशी या शब्दांत भविष्यकाळाची चुणूकही नाही. प्रॉफेसीऐवजी प्रोफेसिंग असते (पीएच्ऐवजी एफ् आणि सीऐवजी डबल एस्)तर एखाद्यावेळी, स्वतःच्या समाधानासाठी खोटा आव आणून बोलणे असा अर्थ लावता आला असता. बरे, 'स्वत:चे खरे करून दाखवणे' की 'स्वत:लाच, तसे नसताना, खरे ठरवण्याचा' प्रयत्न करणे? एखादा माणूस तो म्हणेल ते खरे आहे असे सिद्ध करून दाखवत असेल तर त्याला कुणाच्याही विरोधाला जुमानायचे कारण नाही.
'आत्मसमर्थक प्रतिपादन' हा खरोखरच जर त्यातल्या त्यात योग्य सहजगम्य प्रतिशब्द असेल तर मला मूळ अनाकलनीय इंग्रजी शब्दाकडे लक्ष द्यायचे काही कारण दिसत नाही. तरीसुद्धा, माझ्यासाठी नाही, पण माझ्यासारख्या अतिसामान्यांसाठी जर कुणाला ही संकल्पना स्पष्ट करता आली तर बरे वाटेल.