बहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी पकडलं (वेठिस आणलं) होतं. पण तो शरण आला तेंव्हा त्याच्याकडून खंडणी घेउन त्याला सोडून दिलं. त्यावर महाराजांनी त्यांना खरमरीत पत्र लिहिलं कारण खान दगाबाज आहे हे त्यांना कळलं होतं.
त्याचा प्रत्यय येताच प्रतापराव गुजरांना भयंकर संताप आला अन ते सहा मावळ्यांसह (ते पाणगे होते की सरदार हे माहीती नाही) खानावर चालून गेले. याचा अर्थ काय ? त्यावेळी बाकी लोकं कुठे होते ? हजाराच्या सैन्यावर चालून जाताना आपण किती लोकं आहोत याचा त्यावेळी गुजरांनी विचार केला नाही किंवा तशी सुचनाही इतरांना दिली नाही. गनिमी काव्याने लढणाऱ्या सैन्याला आणि त्यांच्या सेनापतीला हे समजलं नाही असं म्हणावं का ? त्यांचं शौर्य वादातीत आहे, पण हा शुद्ध वेडेपणा होता, हे ही मान्य करावं लागेल.
आजही असच होतं. कालपरवा पुण्यात एका मुलीला भोसकलं तेंव्हा गर्दी जमली होती पण दोघांनीच 'त्या' मजनुला पकडण्यासाठी स्वतःच्या जिवावर उदार होवून त्या मुलीला वाचवलं. तिथे दोघ, तर पुर्वी सातच....... मराठी माणुस असाच मागे पडतो कारण "मला काय त्याचं" ही त्याची प्रवृत्ती !
ह्या प्रवृत्तीवर हा संवाद लिहिला आहे.....