पण सारासार विचार करण्यासाठी जे एक बौद्धिक अधिष्ठान लागते ते पुण्यातल्या लोकांकडे जास्त असते असे वाटते
पुण्याबाहेरचे लोक सारासार विचार करत नाहीत किंवा तो विचार करण्यासाठी जे एक बौद्धिक अधिष्ठान वगैरे लागते ते त्यांच्याकडे नसते हा मुद्दा अजिबात पटला नाही. सोसायटीच्या टाकीचा नळ स्वतःच्याच पिताश्रींचा समजून भर उन्हाळ्यात दिवसभर पाईप लावून गाड्या धुणार्या पुणेकरांकडे सारासार विचार करण्यासाठी बौद्धिक अधिष्ठान आहे हे मान्य करणे अवघड वाटते बुवा. किंवा सिग्नलवर हिरवा दिवा लागण्याची वाट न पाहणे हे उदाहरणही घेता येईल.
सारासार विचार याची व्याख्या व तथाकथित बौद्धिक अधिष्ठानाशी त्याचा कसा संबंध आहे हे स्पष्ट केले तर बरे होईल.