किंवा कोणतेही शहर काय त्यांच्या घडण्याची स्वतंत्र पद्धत असते. त्याच्या घडण्याला भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी कारणीभूत असते. दोन शहरांची तुलना करायची तर त्यांत काहीतरी समान असणे आवश्यक आहे.
समजा चित्रपटांचे किंवा चित्रपट क्षेत्राचे उदाहरण घेतले तर, आमीर खान आणि शाहरुख खान यांच्यात कोण चांगला अशी तुलना कधीच होऊ शकणार नाही कारण त्या दोघांची काम करण्याची पद्धतच वेगवेगळी आहे. फार तर अमुक एक मला आवडतो किंवा आवडत नाही इतकेच म्हणता येईल. ह्याऐवजी दिलीप कुमार यांचा देवदास आणि शाहरुख खान चा देवदास यात तुलना होईल कारण त्यात कथा समान आहे.
जीवनमान, वातावरण, अंतरे, मराठीपणा, बुद्धी, स्वच्छता, माणूसकी, साहित्यप्रेम, चोखंदळपणा, वेळेची उपलब्धता, बऱ्या वेळी घरी येऊ शकणे, वाहनांची संख्या, प्रदूषण, निवांतपणा, जवळ असलेली ऐतिहासिक / थंड हवेची ठिकाणे, सुरक्षितता या सर्व बाबींमध्ये मुंबई आणि पुण्यात साम्यच नाही तर तुलना कुठून होणार?
फारतर मला अमुक एक शहर आवडते किंवा आवडत नाही इतकेच आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा विषयच मुळात व्यक्तिनिष्ठ (subjective) आहे. तुम्हाला जितकं पुणं आवडतं तितकं कोणालातरी मुंबई आवडत असणारच.
फारतर 'आपल्याला कोणतं शहर आवडतं? आणि का?' असा सर्व्हे होऊ शकेल पण तुलनात्मक चर्चा होऊ शकणार नाही असे वाटते. पुणे बरे आहे असे तुमचे मत आहे एव्हढेच म्हणता येईल. तुम्हाला तुमचेच मत मांडायचे असते तर तुम्ही हा विचार चर्चाविषयात कशाला टाकला असता. म्हणून उगाचच चर्चेसाठी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही.
मला पुणं आवडतं आणि मुंबई आवडून घ्यावं लागतं कारण माझी बायको मुंबईची आहे.