होय माझ्या प्रतिसादाचा रोख चेष्टेचाच होता. चेष्टा करण्यासारखंच हे आहे.

इतर कुठल्याही शहरातील मंडळी, 'आमच्या शहरात स्वच्छता आहे' किंवा 'आमच्या शहरात चोरी होत नाही' किंवा 'आमच्या शहरात नवख्या माणसाला पुरेसा पैसा असल्यास पोटभर जेवायला मिळणारच' ही अशी विधानं करतील. व ते समजून घेण्यासाराखं आहे.

परंतु 'फक्त आम्ही लोक बुद्धीमान', 'आम्ही तेवढेच सारासार विचार करणारे' अशी विधाने एका भौगोलिक प्रांतातली मंडळी करतात तेंव्हा त्यांमध्ये मला तरी कसलातरी न्युनगंड असल्याचा ठाम समज होतो. आणि न्युनगंडातून जर कोणी 'फुशारक्या' मारत असेल तर त्याची थट्टा, चेष्टा करून त्याच्या 'न्युनगंडतेचा गळू' हा फोडायलाच हवा.

विशिष्ट भौगोलिक प्रांताचा बुद्धिशी, बुद्धीच्या प्रगल्भतेशी काहीही संबंध नसतो.

मी स्वतः पुण्याला आतापर्यंत राहीलेलो नाही. परंतु 'पुणेरी पाट्या', पुण्याबद्धलचं लिखाण,  तसेच पुण्यातील मंडळींच्या वक्तव्यांवरून, प्रतिसादावरून, पुणं हे पुस्तकी पांडीत्य पाजळणाऱ्या म्हाताऱ्या नव्हे खाष्ट म्हाताऱ्या मानसिकतेचं शहर आहे असं माझा तरी समज दुणावत आहे.