सगळेच जण समजुतदार असते तर वरिल विषयावर चर्चा झाली नसती. पैसा न कमावता करता येणाऱ्या गोष्टी म्हणजे मुलांचे संगोपन, शिक्षण, संकार ह्या महत्वाच्या बाबी येतात.
आणि उत्तम आरोग्य सांभाळण्यासाठी उत्तम जेवण बनवणे हे पण खूप महत्वाचे आहे.
हे सगळे आपापल्या परीने गृहीणी करत असतेच पण त्याची जाणीव घरातल्यांनी ठेवून तिला मदत करायला हवी.
अजूनही कला, छंद ती जोपासून शकते पण तिला साथ हवी असते. नवनवीन गोष्टी ती शिकू शकते.
प्रियाली म्हणतेतसे एच फोर आणि सासू या भिन्न गोष्टी आहेत. हाताची पाच ही बोटे सारखी नसतात तसाच माणसाचा स्वभावही. उपाय पण असेल ना यावर!
भारतात करता येण्यासाख्या खूप गोष्टी आहेत. परदेशामध्ये नवीन आलेल्यांना मात्र सगळे थोडे अवघड असते. नवरा ऑफिसला  जातो तेव्हा इंटरनेट वर शिकण्यासारख्या गोष्टी असतात.
सुट्टीमध्ये फिरून मित्रमैत्रीणीं कडे जावून किंवा त्यांना आपल्याकडे बोलावून वेळ चांगला  घालवू शकतात. हा पण तसा ग्रूप  मिळायला हवा नाहीतर जमवायला हवा.
हे जमले नाही तर मात्र खूप एकटेपणा  जाणवतो.