अचुकता हा माणसाचा, कुटुंबांचा , समाजाचा, देशाचा स्थायी भाव / स्वभाव असावाच. किंबहुना, त्या दिशेने सतत, अविरत प्रयत्नरत असणेच, उपरोक्त घटकांच्या उन्नतीचे निदर्शक नव्हे काय? अटितटीच्याक्षणी, मित्रांच्या छोट्यातछोट्या चुका, शत्रुपक्षाच्या कितीतरी पथ्यावर पडतातच, हे ज्याला कळते, तो अशा उत्कट, बिकट ध्येयाने झपाटल्याशिवाय राहतो का?

अनेक व्यावसायीकांच्या छोट्या चुका, जिवांना हिरावून नेणाऱ्या ठरतात. एकदा अचुकता, अंगी बाणली की ती यत्र तत्र सर्वत्र उपयोगात आणली जाते. जपानी समाज अशाच उच्च व सततच्या आचारामुळेच, राखेतून भरारी घेऊ शकला यावर कोणाचे दुमत असेल? सामाजीक विकृतींचा उच्च[अव]मानबिंदू हा सततच्या त्याच त्याच चुकांच्या पुनरावृत्ती पासून उद्भवणार नाहीत का?

सहसा समुहात, आहे न कोणीतरी आपले सावरायला, म्हणून चुका करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे.

"थोडे निर्लज्ज झाले की, फायदाच फायदा " हा मतप्रवाह मराठी समाजात आयात होत असलेला प्रकर्षाने जाणवत नाही?

यातुनच " कमिशन / ओमीशन " सारखे अदंडनीय पण ईतरांना प्राणघातक अपराध वाढताना दिसत आहेत. चुक झाली की केली हे ठरवणे दिवसेंदिवस अवघड होताना दिसते.

परदेशस्थ मराठी माणसांनी आपले विचार मराठीत प्रकट नक्कीच करावेत. पण,त्यांच्या बिनचुकतेसाठी आवश्यक अशा साधनांचा, साहित्यांचा मुबलक वापर देखील करावाच.

धन्यवाद.