आपण असामान्य असणारच. पण कधीकधी सामान्य नसणारी माणसे असामान्य नसून आणखी
काहीतरी असतात, हेही लक्षात असावे. कशी ते स्पष्ट करायला नको.
याला समर्पक उत्तर असलेल्या 'आय लव्ह यू, टू!' या अमेरिकन बोलीतील खास वाक्प्रचाराचे शब्दशः भाषांतर 'माझेही तुमच्यावर प्रेम आहे' असे केल्यास ऐकणारास त्यातून भलताच अर्थ सूचित होऊ शकतो. (सामान्य अमेरिकनास मूळ अमेरिकन वाक्प्रचारातून तो तसा होत नाही / होऊ नये, आणि जे समजायचे ते समजते / समजावे.)
परभाषेतील संकल्पना मराठीतून व्यक्त करताना त्यासाठीच्या परभाषेतील मूळ संज्ञेचे शब्दशः भाषांतर करण्यामागील धोक्याचे हे उत्तम उदाहरण असावे. भावानुवाद महत्त्वाचा.