मला एवढचं म्हणायचा आहे कि जे शब्द (मराठी शब्द) आपण नेहमी वापरतो, ते तरी वापरावेत.... नाहीतर काही वर्षांनी त्यांची पण अवस्था आपण उदाहरणादाखल दिलेल्या काही शब्दांसारखी होईल....फक्त क्रिकेटशी संबंधितच शब्द असं नाही. आज वर्गात मराठी शिकवताना सुद्धा फुल स्टॉप, कॉमा, सेमी कोलन म्हणतात... पूर्णविराम, अर्धविराम विसरून गेले आहेत

हे तुमचे मत झाले. काहींना एकही इंग्रजी शब्द नको असतो. मुद्दा हा की सक्तीने वळण लावून भाषा बदलता येते का? भाषा ही वेगळी नाही, आपली संस्कृती, आचार-विचार यांच्याशी निगडीत आहे. बाकी सर्व बदलत असताना भाषा तशीच राहील अशी अपेक्षा करणे कितपत बरोबर आहे? ज्ञानेश्वर, शिवाजीमहाराज यांच्या काळातील मराठी आणि आत्ताची मराठी यातही फरक आहे. शिवकालीन मराठीचा संदर्भ घ्यायचा म्हटला तर आत्ताची मराठी भाषा पूर्णपणे बाटली गेली आहे. या संबंधात ही चर्चा वाचावी.
हॅम्लेट