अनेकांचे असे ठाम मत आहे की इंग्रजी शब्द वापरले तरच भाषा प्रभावी ठरते.
तसे नाही. मराठी बोलताना जेथे उपलब्ध आहेत तेथे मराठी शब्द वापरणे कधीही श्रेयस्कर. आणि जेथे उपलब्ध नाहीत तेथेही सोपे, सुटसुटीत आणि कोणाच्याही तोंडी सहज बसू शकणारे / कोणालाही सहज कळणारे शब्द जरूर बनवावेत. परंतु मराठीकरणाच्या नावाखाली क्लिष्ट, बोजड आणि मुद्दाम समजावून सांगितल्याशिवाय कोणालाही सहज न समजू शकणाऱ्या (किंवा कधीकधी समजावून सांगितल्यावरही समजू न शकणाऱ्या) संस्कृतमय शब्दांच्या (आणि त्याद्वारे संस्कृतच्या) पार्श्वप्रवेशा*चा अट्टाहास काय कामाचा?
किंवा संस्कृतात काय किंवा मराठीत काय, शब्दशः भाषांतर तरी काय कामाचे? भावानुवाद महत्त्वाचा.
*'बॅकडोअर एंट्री'चे हे मराठीकरणाच्या नावाखाली शब्दशः संस्कृतीकरण कसे वाटते?