शब्द हा केवळ निर्देश करतो. शब्दाचे प्रयोजन बोलणाऱ्याचे विचार किंवा भावना व्यक्त करणे इतकेच असते. 'क्रिकेट' म्हंटल्यावर बोलणाऱ्याला अभिप्रेत असलेला अर्थ एकणाऱ्याला समजला की शब्दाचे प्रयोजन संपते. त्यामुळे अभिव्यक्तिची सहजता भाषेपेक्षा महत्त्वाची ठरते. भाषेच्या दुराग्रहामुळे मुळात एक असलेल्या मानवतेचे कल्पनिक विभाग होतात (भारताचे काय झाले आहे बघा) आणि काय करायचे आहे किंवा सांगायचे आहे ते बाजूला राहून भलत्याच गोष्टीला महत्त्व येते. या चर्चेतून भाषा महत्वाची नसून सांगणाऱ्याचे म्हणणे काय आहे हे समजणे महत्त्वाचे आहे हे लक्षात आले तर चर्चा सार्थक होइल.  भाषेचा उपयोग आहे पण भाषेपेक्षाही माणूस आणि त्याचा हेतू महत्त्वाचा आहे. जर एखाद्या अभिव्यक्तीसाठी मराठीत सहज अर्थ व्यक्त होणारा शब्द नसला आणि बहुतेकाना समजेल असा दुसऱ्या भाषेतला पर्यायी शब्द वापरला आणि तो रूढ झाला तर भाषा लवकरात लवकर समृद्ध आणि व्यापक होते. इंग्रजी समृद्ध आणि व्यापक त्यामुळेच झाली आहे. भाषेचा दुराग्रह आणि बंदिस्तता बोलणाऱ्यांची संख्या कमी करत नेवून ती भाषा संपवून टाकतात.