- उद्धट कन्या* [ *आईबापांशी उद्धट वर्तन करणारी] अज्ञाधारक सून होऊच शकत नाही.
- आई-वडिलांचा अनादर / निरादर करणारी कन्या* कोणत्याच ज्येष्ठ, श्रेष्ठ व्यक्तीशी समरसून राहू शकत नाही.
- सुनेला, मालकाचे व व्यवस्थापकाचे कर्तव्याधिकार व जबाबदाऱ्या व त्यांच्या कक्षा माहिती नसतील तर ती घरात वा बाहेर [ नोकरीच्या जागी ] आपापले कर्तव्य योग्य रितीने पार पाडुच शकत नाहित. सासू समोर, तीला व्यवस्थापक व्हावे व सासुनंतर आपल्या सुने समोर मालक एवढे तारतम्य न बाळगणाऱ्या सुनेचे सर्वांशीच तंटे, मतभेद होणारच.
- मालकीण बनण्याच्या घाईत, अशा कन्या / सुना, सासूंना सक्तीच्या निवृत्तीवर पाठवताना / आकांत मरणाच्या दाराशी लोटताना दिसतात.
- कोणत्याही नात्यांत " अपेक्षा व्यवस्थापन " अतिशय महत्त्वाचे. म्हणजे, त्यांचे नियोजन, आयोजन, नियंत्रण, ई. तीला जमावेच.
- सासूशी जुळवून घेताना, सामाजीक कौशल्यांचा फक्त साधक परिणाम कसा साधावा व बाधक / अवांछीत परिणामांना कसे दूर ठेवावे हे न समजल्यास खटके कायम उडणारच. उदा. मैत्रीणीच्या सासूवर एखादा डाव बसला म्हणजे तो आपल्या सासुवर बसेल / बसवावाच असे अंधानुकरण देखील टाळावेच. स्वतःची दैनंदिनी ठरवतानाच घरातील, ज्येष्ठांना, त्यांची दैनीक, साप्ताहिक, मासीक वेळापत्रक ठरवण्यास तसेच ते राबवण्यास मदत करावी.
- कोणीतरी म्हटल्या प्रमाणे, कोणत्याही नात्यात, अक्षम्य अपराध टाळण्यानेच ते नाते टिकते.
या व अशा अनेक टिप्स, थोरा मोठ्यांच्या अनुभवांचा एकत्रीत संग्रह / लॉग अनेकवार पाढ्यांप्रमाणे पाठ करावा.