आणिबाणीनंतरच्या निवडणुकीत आमचे घर म्हणजे जनता पक्षाचे कार्यालयच झाले होते. मला एव्हढेच चित्र डोळ्यासमोर येते की बाहेरच्या खोलीत कापडी फलक बनवण्याचे काम जोरदार चालू होते. रंगांचे डबे, झाडू, काठ्या आणि ते रंगवणारी आणि ये जा करणारी माणसे बस्स एवढेच आठवते.

त्या निकालाच्या दुसरे दिवशी आमचे जनता पक्शाचे उमेदवार पडले याचा कोणी उल्लेख केला तरी मी लगेच 'पण इंदिरा गांधी पण पडल्याच की' असे बाणेदारपणे म्हणत असे. निवडणुक म्हणजे काय हे कळण्याचे वय नसून उगिचच अभिनिवेष. पण खरेच त्या इलेक्षनसारखी दुसरी नाहीच.

तीच का अजून कुठली निवडणुक ते नीटसे आठवत नाही पण निवडणुकीनंतरच्या विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत विरोधी पराजित उमेदवाराच्या नावाने 'हत्तीवर हत्ती अंबारी *** झाला डोंबारी' (ते *** च्या जागी बहुदा कदम हे नाव होते) हा गजर ऐकून ऐकून माझी २/३ वर्षे वयाची बहीण रात्री झोपेत उठून छान टाळ्या तेच ठेक्यात टाळ्या वाजवत म्हणत बसली होती.

किंचित अवांतर - सध्या बूट्माऱ्याची बातमी वाचल्यापासून उगाचच 'सोनियेच्या हाती टायट्लरची गच्ची' (चाल - सोनियच्या ताटी उजळल्या ज्योती) हे गुणगुणून हौस भागवून घेत आहे.