रावले साहेब, बुद्धिमत्ता आणि बौद्धिक अधिष्ठान ह्यामध्ये खूप फरक आहे. माझं असं मुळिच म्हणणं नाहिये की पुण्यातले लोक जास्त बुद्धिमान (आयक्यु ह्या अर्थी) असतात. आणि बाकिची शहरं वगैरे काय लावलय. चर्चेचा विषय हा पुणे आणि मुंबई एव्हढाच मर्यादित होता.
मूळ मुद्दा असा होता की, पुण्यातले लोक जास्त स्मार्ट वाटतात. आणि हे मला खुद्द काही मुंबईकरांनीच ऐकवले आहे. त्यावरून असे का असावे ह्याचा विचार केल्यावर हे 'बौद्धिक अधिष्ठान'चं कारण असावे की काय असे वाटले.