आपण डॉटरांनी मना केल्यानंतरदेखील चकली खातो ती जीभेचे चोचले पुरवण्यासाठी! शरीराला ती हवी म्हणून नव्हे.

शरीराला हवे म्हणून नव्हे तर चोचले पुरवण्यासाठी काहीही खाणे म्हणजे अन्नाची नासाडीच की. त्याचा विरोध समजू शकतो. पण तोंडात टाकलेला तुकडा पुन्हा तोंडातुनच बाहेर काढला काय किंवा पचनसंस्थेत ढकलून प्रक्रिया करून गुदद्वारातून बाहेर काढला काय, ह्याने काय फरक पडतो? दोन्हीही वेळेस तो तुकडा वायाच जाणार आहे तसेच कुणाही गरजुच्या पोटात सुद्धा जाणार नाही आहे. असे असताना निव्वळ पहिल्या प्रकारावर इतका आक्षेप का ते समजले नाही.