क्लासिकल / शास्त्रीय संगीत [लेखी/बोली मराठी] विरुद्ध कामचलावू /सवंग संगीत [लेखी/बोली मराठी ] असे दोन मुख्य मराठी भाषेचे प्रकार थोड्याकालावधीने ठळक दिसतील समाजात.
श्री राहुल्यांनी म्हटल्या प्रमाणे प्रसार माध्यमेच, सवंग मराठी भाषेचा, प्रचार / प्रसार करत / करणार असतील, तर शेवटी मनुष्य काय बोलतो, जे ऐकतो वा वाचतो तेच ना?
अन सतत, अशीच कामचलावू / सवंग मराठीच कानावर, वा वाचण्यात येणार असेल तर आजपासून १०/१५/२० वर्षांनी आपण / नवीन पीढी काय बोलत असेल, कशी बोलत असेल याचा अंदाज न केलेला बरा.
नाहीतरी एका [सवंग] गायन / संगीताच्या कार्यक्रमात, आ. लताजी, व्यासपिठावर कानात बोट घालून बसल्याचे छायाचित्र , याठिकाणी व समयोचीत नाही का? आधी हिंग्लीश झाले मग आता मराग्लीश वगैरे कानावर पडेल.
सब हायब्रीड बनाना है, भाईयो और बहनो. इसी तरिकेसे मराठी उंट को पहाड के नीचे लासकते है. वर्ना ये अपने बस मे आनेवाला नही. ये उंची उडान भरनेवाला विमान प्रवासी है.
धन्यवाद.