माफ करा. पण हे कवितेचे विडंबन वाटत नाही.
हे कवीचे विडंबन वाटते. मला आवडले नाही.
न आवडण्याचे कारण हे की मूळ कवितेची जमीन जशीच्या तशी घेऊन सरळ सरळ चावटपणा करणे किंवा काहीतरी निरर्थक वाह्यात लिहिणे यात काही विशेष नाही. ( म्हणुनच मी इतर विडंबनांचाही निषेध करतो. )
आपण माझ्या गझलेचे केलेले विडंबन हे योग्य विडंबन होते. पण वरील विडंबनांप्रमाणे विडंबने करणे त्यागावे अशी विनंती!
( अवांतर - मी आता विडंबनांवरच एक कविता करणार आहे. कारण पोटतिडकी हा माझा जन्मजात दुर्गूण आहे. )