हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे हे पटलं.

पण,

१) ह्या विषयावर पुणे आणि मुंबई व्यतिरिक्त इतर शहरातील, गावातील लोकांनी चर्चा करायला हरकत नाही. कारण त्यांना मुंबई किंवा पुण्यामध्ये नोकरीनिमित्त स्थायिक व्हावं लागतं. त्यांच्या द्रुष्टिकोनातून पुणे आणि मुंबई चे 'प्रोस' 'कॉनस' ऐकायला आवडेल.

२) पुण्यातल्या लोकांना देखिल नोकरीनिमित्त वगैरे मुंबईमध्ये स्थायिक व्हावं लागतं (उलटं होण्याची शक्यता कमी). आणि मी पुणेकर असल्याने एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे, असे पुणेकर जे बाहेर राहतात, त्यांच्यावर  घरून एक प्रकारचे प्रेशर असते. की, काही काळ बाहेर राहिलात ते ठीक आहे, पण आता परत या. ह्याचे कारण कदाचित 'पुणे तेथे काय उणे' ही मानसिकता असावी  . त्यामुळे देखिल पुणेकरांच्या द्रुष्टिने पुणे मुंबई तुलनात्मक विचार महत्त्वाचे ठरतात.

त्यामुळे ह्या विषयावर चर्चा करुच नये, असंही काही नाहीये.