बौद्धिक अधिष्ठान म्हणजे एखादी गोष्ट करताना अनेकविध मार्गांनी विचार केल्यावर व असलेली सर्व बुद्धी वापरून करणे.
हे मुंबईला होत नाही.
आधी डान्स बार काढू देणे. ते आमदारांनीच चालवणे. भ्रष्टाचारातील पैसे तिथे संपणे. एखाद्या मुलाने आईचा खून करून तिचे मंगळसुत्र विकून त्या पैशात डान्स बारमध्ये एक रात्र घालवणे. हे अति झाल्यावर मग डान्स बार बंद करण्याचा कायदा काढणे. मग त्याच मुली वाममार्गाला लागू शकतील अशी बार संचालकांनी धमकी देणे. त्यात अनेक गोंधळ होणे. परत छुपे डान्स बार आहेत म्हणून गलका होणे. यात बुद्धी नाही.
डान्स बार पुण्यात झाले नसते असे नाही. पण ते लोकांनीच बंद केले असते.
( याला आपण सध्या बौद्धिक अधिष्ठान असे म्हणू शकता. )