'घोडा' म्हणायचं असेल तर तो प्राणी घोडाच असायला हवा. माकडाचं डोकं व गाढवाच धड असणारा विचित्र प्राणी उभा करून त्याला आम्ही घोडा म्हणतो व तुम्ही ही म्हणा, या प्रकाराला काय म्हणायचं?
मला १००% खात्री आहे कि तुम्हाला 'वैचारीक बैठक' असं म्हणायचं आहे. परंतु फक्त 'आम्ही की नई पूण्याचेऽऽऽ' हे दाखविण्यासाठी तुम्ही 'बौद्धिक अधिष्ठान' असा भव्य-दिव्यतेचा आभास निर्माण करणारा शब्द योजित आहात. रावसाहेब, तुमचं येथे चूकतंय! बैठक वैचारीकतेलाच असू शकते, बुद्धिला नाही. बुद्धी काय मांडी घालून बसणार?
एखादं शहर चांगलं कि वाईट हे ठरवताना त्या शहरात नव्याने येणाऱ्या/ त्या शहराबद्दल एकणाऱ्या/वाचणाऱ्या लोकांना ते कसे वाटते यावरच ते शहर चांगले की वाईट हे ठरवता येवू शकते. पूण्याच्या माणसांना त्यांच्या शहरात काय वाटतं वा त्यांच्या तोंडावर लोकं काय म्हणतात याला तितके महत्त्व देणे उचित नाही. एखाद्या शहरामुळे तिथं नव्यानेच येणाऱ्या लोकांना तिथल्या चांगल्या गोष्टी कोणत्या वाटल्या?, चागले अनुभव कोणते? हे जाणणं महत्त्वाचे. 'आमच्या तोंडावर आम्हाला मुंबईची लोकं स्मार्ट म्हणतात' ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे.