"देव करो आणि कोणाच मनोगतींना पथ्यावर राहयची पाळी न येवो! " ही तत्कालिक प्रतिक्रिया होती.
मूळात हे लिखाण मी 'उचलली जीभ लावली टाळ्याला' पद्धतीचे केलेले नाही.
अनेक मनोगतीनी मी मांडलेल्या विचारास तीव्र विरोध दर्शवलेला आहे. बहुतेकांचे म्हणणे खाण्यापिण्याबाबत संयम पाळणे महत्त्वाचे आहे. त्या विषयी कोणाचेच दुमत असू नये. पण संयम पाळण्यात अनेक व्यावहारिक/ मानसिक अडथळे असतात. म्हणावे तितके ते सोपे नक्कीच नव्हे! शिवाय असे पूर्ण संयमी जीवन अळणी बनते. रसिकता संपते. रसास्वाद हा जीवनाचा एक प्रमुख उर्जास्त्रोत आहे हे मान्य व्हावे. निरसता मनुष्याला जगण्याची प्रेरणा कशी देईल?
चघळून टाकून देणे म्हणजे अन्नाची नासाडी असे अनेकांना वाटते. आम्ही तर "कणः त्यागे कुतो धनं" संस्कृतीत वाढलेलो. काहीही वाया घालवू नये ही वृती अंगी मुरलेली. या स्थितीत नासाडीचा विचारदेखील मनाला शिवणार नाही. जेव्हा मुखाने त्या पदार्थाचा पुरेपूर रसास्वाद घेतला गेला, तेव्हा तो पदार्थ वाया गेला असे म्हणता येणार नाही. फक्त तो पोटात घालून पचनसंस्थेद्वारे बाहेर काढला नाही म्हणून तो वाया गेला असे म्हणायचे काय?
वमन-प्रक्रियेशी या कृतीचे साम्य आहे असे कोणास वाटते. वमन प्रक्रियेत आपल्या इंद्रियांना अकारण छळणे आहे, ते यात मूळीच नाही.
किळसवाणे वाटणे ही गोष्ट मी समजू शकतो. त्याची मला जाणीव आहे. पण एक अपरिहार्यता म्हणूनच मी तिचा स्वीकार करतो आहे. आणि म्हणूनच मी हे खाणे एकांतात करणे योग्य असे सुचविले आहे.
मृगनयनास हा विचार स्वार्थी वाटतो. 'स्वार्थ' या शब्दातील स्व वगळला तर त्या शब्दाला काहीच अर्थ नसतो हे खरे काय?समाजाचा संबंध यात जवळजवळ नाहीच! जवळच्या नातेवाईकांचा मात्र असू शकतो; आणि त्यांचा विचार मी वरीलप्रमाणे केला आहे.
या उपरदेखील ज्या कोणास या मार्गाचे अनुसरून करणे अयोग्य वाटते, त्याने ते अजिबात करू नये. एवढे स्वातंत्र्य त्याला आहेच!