अन्न, भोजन, शरीर इतक्या सुंदर गोष्टींवर तुम्ही अश्या प्रकरच्या चर्चा केवळ अज्ञानामुळे करता आहात. मुळात शरीर हे अन्नाचे रूपांतरण आहे त्यामुळे शरीर आणि अन्न ह्या दोन्हीही कालजीवी वस्तू आहेत. दोन्हीही क्षणभंगुर असल्यामुळे दोन्हीची मजा काही औरच आहे. भूक, अन्न आणि संभोग या त्रिमीतीवर ही प्रकृती प्रकट आहे. भूक ही ऋण भार आहे आणि अन्न हा धन भार आहे, या दोन विरूद्ध भारांच्या मिलनातून उर्जेची निर्मिती आहे, त्या उर्जेचे व्यक्तरूप शरीर आहे.
उत्तम भूक ही उत्तम अन्न आकर्षित करते. उत्तम भूकेसाठी शरीर उत्तम राबले पाहीजे. शरीर उत्तम राबवण्याचा सहज उपाय खेळ आहे. उत्तम खेळासाठी लवचिकता हवी त्यासाठी योगा सारखी सुंदर साधना निर्माण केली आहे. उत्तम शरीर हे उत्कट आणि संवेदनाशील मनाचा आधार आहे. कारण विचार हा शरीराचाच अमूर्त भाग आहे. असे मन हे सृजनाचा स्त्रोत आहे. सृजन ही आनंदाची प्रक्रिया आहे.
उत्तम शरीर हा निसर्गाशी एकरूप झालेला निसर्गाचा भाग आहे त्याच्या उत्सर्गातून निसर्ग पुन्हा स्वतःला निर्माण करतो.
तुम्ही काय आणि कश्या चर्चा करता आहात? तुम्हाला खेळ शक्य नसेल तर चालणे भरपूर चालणे ही पर्यायी नैसर्गीक सोय आहे. मृत्यू हा जीवनाच्या परिपूर्णतेचा परमोच्य बिंदू आहे. आपण पुन्हा निराकार आणि व्यापक होतो. भीती, काळजी चिंता सगळे निराकारण आहे.