मी चर्चेचा समारोप करू इच्छितो...सर्वांना त्यांनी दिलेल्या मतांबद्दल धन्यवाद...!!!
दोनही मतप्रवाह बघायला मिळाले.. एक, मराठीची जपणूक आवश्यक आहे आणि दुसरा, कि याची काही गरज नाही.
जरी ज्ञानवृद्धिसाठी, प्रगतीसाठी इतर भाषा (इंग्लीश प्रामुख्याने) येणे गरजेचे असले तरी सुद्धा मराठीच्या जपणूकीसाठी तिचा वापर होणे आवश्यक आहे आणि हे काम वृत्तपत्रे, वाहिन्या जास्त प्रभावीपणे करू शकतील.
मराठीची जपणूक ह्यासाठी कि मराठी हि एक ओळख आहे मराठी समाजाची... आणि भाषांनुसार विभागलेल्या आपल्या देशात आपण हे नाकारू नाही शकणार.. पण ती जपताना देशाचे ऐक्य जपणे सुद्धा महत्त्वाचे आहे..
मनोगतावरील चर्चांना निष्कर्ष असावा असे माझे मत आहे.. आणि हि चर्चा मी सुरू केलेली म्हणून मीच हिचा समारोप करतो. माझे मत सर्वांना मान्य असावेच असे नाही.