कोलबेर, जे आपल्याला 'किळसवाणे' वाटत नाही आहे, ते 'हॅम्लेट' यांना वाटते आहे. सर्वसामान्य भारतीय ते किळसवाणेच समजेल.
मला किळसवाणे वाटत नाही असे मी कुठे म्हंटले आहे? माझा मुद्दा फक्त नासाडीचा आहे. किळसवाणे, अनैसर्गिक हे ज्याचे त्याचे वैयक्तिक मत झाले. स्वतः लेखकाने सुद्धा हे कबुल केले आहे (हा प्रयोग एकांतात करा इतरांना किळस नको! ) किळस येत असेल अनैसर्गिक वाटत असेल तर नका करू. पण एखाद्याने हे (खाजगीत) केले तर त्याला आक्षेप का? हा प्रकार म्हणजे अन्न वाया घालवणे नाही (त्याला पर्याय हा अन्न पोटात ढकलणे असेल तर). ज्याला जमेल त्याने करावा ज्याला जमणार नाही त्याने करू नये इतकेच माझे मत आहे.
भूक हा निसर्गाचा निर्देशक आहे. ती भूकच तुम्हाला काय खावे आणि किती खावे हे सांगेल.
असहमत.भूकेला दोन घास कमी खात जा हा तर आहारशास्त्राचा पहिला नियम सांगतात. भूक भागली आहे, आता खाणे थांबवावे असा निरोप मेंदूला उशीराने मिळतो. त्यामुळे भूक पूर्ण भागायच्या आताच थांबा थोडा वेळ जाऊ द्या आपोआप पोट भरल्यासारखे वाटते असेही सांगीतले जाते. थोडक्यात भूक ही फसवी असते ती काय खावे आणि किती खावे हे अजिबात सांगत नाही.