भूक लागल्यावर खाणे हे अगदी योग्य म्हणता येत नाही.
शरीर हे यंत्रासारखे काम करत असते. त्याला नियमित इंधनाची (आहाराची) गरज असते. एखादेवेळी मानसिक ताण, आनंद किंवा अशा भावनांतून भूक कमी-अधिक होण्याची शक्यता असते. अशावेळेस, भूक शमन होईपर्यंत खाणे हा पर्याय योग्य ठरत नाही.
आहार नियमित असावा. एखादेवेळी कमी-अधिक खाणे योग्य आहे परंतु खाण्याच्या वेळा नियमित कराव्यात. मग, भूकही या वेळांनुसार लागते आणि नियमित अन्नानेच भागते असा स्वानुभव आहे.