भूषणराव,
पुण्याची राहणी, त्याविषयीचे प्रकटन असे काही आपल्या मनात आहे असे वाटते. जरा सविस्तर मांडा पाहू. आधी पुणे कसे होते, आता कसे आहे? कोणते ठळक बदल झालेत, पुढे काय होईल , ते योग्य की अयोग्य ? श्रेय कोणाला असे सर्व मुद्दे. मुंबईशी तुलना करत सांगा. अतिशय वाचनीय होईल . 'पुणे' रदीफ असणारी गजल सुचते का पहा बरे... आम्ही आपल्या गजलांचे वाचक आहोत.
अवांतर- आम्हाला पुणे अतिशय आवडते. म्हणूनच आम्ही त्याविषयी काही लिहिणार नाही. जे उत्तम आहे ते श्रेष्ठ कसे हे मुद्दाम कुणाला सांगण्याची गरज आम्हाला वाटत नाही.