धुळीच्या जागी देशापुढचा एखादा प्रस्न कल्पिला की कथा कळते. देशच कशाला, तसेही माणसापुढचा प्रश्न कल्पिता येईल. एरवी ती क्रिप्टिक आहे. असे माझे
आमच्या फ्लॅट स्क्रीन टीव्हीवर तो आहे, तो एमपीथ्री प्लेअरवर आहे. मुलांच्या खेळण्यांवर आहे. पलंगावर, कोचावर आहे. आमच्या खिडकीतून पिवळसर धुळीने माखलेले सर्व काही आम्हाला दिसते आहे.
'मोठमोठ्या आंतरवैश्विक समस्या सोडवण्या(चा आव आणण्या)ऐवजी एखादा (समाजाला विघातक) विचार सगळीकडे पसरत आहे तो आधी आवरा' असे उपरोधिकपणे आणि कूट रीतीने सांगायचे असावे असे वाटले.
डायनॅसोर वगैरे वगैरेचे मोठे मोठे सिनेमे आणि पुस्तके ह्यामागे लागण्यावर उपरोधिक भाष्य करणारा एक चित्रपट पूर्वी दूरदर्शनवर पाहिला होता त्याची आठवण झाली. त्यात एका पत्रकाराला (की सिनेमानिर्मात्याला?) एका गावाजवळच्या जंगलात डायनॅसोर असल्याचा सुगावा लागतो. डायनॅसोर गावातल्या मुलांचा मित्र असतो, आणि मुलांना त्या डायनॅसोरचे इतर अप्रूप काहीही नसते. मात्र तो पत्रकार त्याचा आपल्या प्रसिद्धीसाठी/धंद्यासाठी उपयोग करून घेताना पाहिल्यावर त्या मुलांची आई त्या पत्रकाराला चांगले दोन शब्द सुनावते ... असे आता अंधुकसे आठवते.