या वाढीची गती एक छोटा कप ५० मिनिटात भरेल किंवा एखादी खोली सहा सात तासात भरेल एवढी होती.
हळूच आमच्या घरातच आला आहे. उभारलेल्या भिंतीवरून, आमच्या कड्याकुलपातून, खिडकी दाराच्या पडद्यातून तो आत घुसला आहे. आमच्या घरातील वस्तूंवर, टेबलावर, खिडकीच्या तावदानांवर तो साचत जातो आहे. वाढतो आहे कणाकणाने क्षणाक्षणाला.................
आमच्या फ्लॅट स्क्रीन टीव्हीवर तो आहे, तो एमपीथ्री प्लेअरवर आहे. मुलांच्या खेळण्यांवर आहे. पलंगावर, कोचावर आहे. आमच्या खिडकीतून पिवळसर धुळीने माखलेले सर्व काही आम्हाला दिसते आहे. या धुरळ्यापुढे वाहनांचे प्रदूषण काहीच नाही, कारखान्यांचे निघणारे धूर काहीच नाही असा वाढत जाणारा हा नवा पिवळा ड्रॅगन आहे.
ह्यावरून पूर्वेकडील देशात निर्माण होणाऱ्या स्वस्त वस्तू जिकडे तिकडे वेगाने दिसू लागल्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अधोरेखित करायचा असावा.