जून आवाजात
साखरकारखान्याचे धुराडे क्षितिजावर आभाळाला काळपट खड्डा पाडताना दिसू लागले.
काचगोट्यांसारख्या डोळ्यांनी
कापरासारखी कणाकणाने उडून जाणारी
मला राठ करून अखेर आबा गेले.
या शब्दयोजना आवडल्या.
कथावस्तूही चांगली.
पण विद्यार्थी तिच्या तीर्थरूपांची जमीन लुबाडतो हे पटत नाहीं. तसेंच पुढारी तिची नोकरी घालवतो, हेही पटत नाहीं. बापलेक दोघेंही संघर्ष न करतां परिस्थितीला शरण जातात. त्या नेभळटांची कींवही येत नाहीं. त्यामुळें कथा तेवढी भिडली नाहीं. आपल्या कथांची नेहमीची सफाई जाणवली नाहीं. उदा. निळ्या शाईचें पेन.
पुढील कथेंत जास्त अपेक्षा बाळगतों.
सुधीर कांदळकर.