हे मला किळसवाणे का वाटते
हा रोचक प्रश्न आहे.
थोडा विचार केल्यावर असे जाणवले
की च्यूइंगगमकडे
मी खाण्याच्या दृष्टीने कधीच बघत नाही त्यामुळे
तो थुंकला तर
काही वाटत नाही.
हा अर्थातच कंडीशनिंगचा भाग झाला
तरीही
थुकलेल्या च्यूइंगगमचा ढीग पाहिला
तर कसेसे वाटण्याची शक्यता आहे.
याउलट चकली म्हटले की एका खमंग, खुसखुशीत
आणि रूचकर अशा पदार्थाची जी कल्पना आहे
ती थुंकलेल्या चकल्यांचा ढीग पाहिला
तर नष्ट होण्याची भीती वाटते.
हे अर्थातच पूर्णपणे सापेक्ष आहे,
सर्वांना असे वाटेल असे अजिबात नाही. 
शिवाय असे वाटू शकते ही
शक्यताही लेखकाने
व्यक्त केलीच आहे.

बाकी प्रतिशब्द हा
आमचा प्रांत नसल्याने
त्यावर.... पास.

हॅम्लेट

ताक: फॉरम्याटवरून ही कविता/नज्म वाटण्याची शक्यता आहे.  (कदाचित त्या विभागात
टाकली तर प्रतिसादही येतील. )
काही कारणास्तव वाक्ये फॉरम्याटींगला दाद न देता मनाला येईल तिथे
जात आहेत.

लोणी : हे लिहील्यावर मुद्दाम नज्मसारखे फॉरम्याटींग करून पाहिले.