याउलट चकली म्हटले की एका खमंग, खुसखुशीत
आणि रूचकर अशा पदार्थाची जी कल्पना आहे
ती थुंकलेल्या चकल्यांचा ढीग पाहिला
तर नष्ट होण्याची भीती वाटते.

चघळून थुंकलेल्या चकलीचे चकलीत्व कधीच संपुष्टात आलेले असल्यामुळे अशा ढिगाकडे 'चकलीचा ढीग' या दृष्टिकोनातून न पाहता केवळ 'एक ढीग' या दृष्टिकोनातून पाहिल्यास ही समस्या सुटू शकेल असे वाटते. अर्थात खात्री नाही. प्रयोग जरूर करून पाहावा.

ताक: फॉरम्याटवरून ही कविता/नज्म वाटण्याची शक्यता आहे.  (कदाचित त्या विभागात
टाकली तर प्रतिसादही येतील. )
काही कारणास्तव वाक्ये फॉरम्याटींगला दाद न देता मनाला येईल तिथे
जात आहेत.

लोणी : हे लिहील्यावर मुद्दाम नज्मसारखे फॉरम्याटींग करून पाहिले.

असाच गद्यातील ओळी वाटेल तिथे तोडून कविता म्हणून खपवून देण्याचा एक प्रयोग आम्हीही पूर्वी केला होता. बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाले हे कळवण्यास अत्यंत आनंद होतो.