किळस कुणाला कशाची आणि किती यावी ह्यावर काही सांगता येत नाही.

आता ओकारी मलविसर्जन वगैरे किळस म्हणून म्हणता येईल. तरी उसर्जित पदार्थ काही क्षणांपूर्वी आपल्या शरीरात होता असाही विचार करता येईल आणि किळस टाळता येईल.

पण

जेवण्याने कुणाला किळस येईल ह्यावर कुणाचा विश्वास बसेल का? जेवताना होणारा भुरक्यांचा, घटाघटा पिण्याचा, ढेकरांचा आणि चुळा खळाखळा थुंकल्याचा आवाज जर कानी पडला तर तेही आपल्याला किळसवाणे वाटेल. जेवणाची वर्णने करणे माणसे जेवत असलेले फोटो सारखे दाखवणे ह्यानेही अति झाल्यावर एखाद्याला किळस वाटेल.

मुद्दा असा आहे की हे सगळे सापेक्ष आहे.