जेवणाची वर्णने करणे माणसे जेवत असलेले फोटो सारखे दाखवणे ह्यानेही अति झाल्यावर एखाद्याला किळस वाटेल.
व्हिडियोकॅमेरा हाताशी असणारांनी एक प्रयोग करून बघण्यासारखा आहे. कोणीही जेवत असताना त्याच्या तोंडाचा - केवळ तोंडाचा, चेहऱ्याचा नव्हे! - क्लोझअप शॉट (मराठी? ) घेऊन त्याचे चित्रण करावे. ते चित्रण करत असताना किंवा नंतर पाहताना नेमक्या काय भावना होतात त्या मला सांगू नयेत - त्या स्वतःजवळच ठेवाव्यात.
कोण्या एका कादंबरीत (नक्की कोणती ते आठवत / माहीत नाही - मी वाचलेली नाही.) 'एका अज्ञात बेटावरील समाजात लैंगिक व्यवहार ही सामान्य, चारचौघात सहज बोलण्यासारखी आणि करण्यासारखी गोष्ट, तर जेवणे ही एक अत्यंत अश्लील आणि गोपनीय क्रिया असणे - इतके, की त्या समाजाच्या भाषेतील अपशब्द हे खाण्यापिण्यावरून असणे' हे कथाबीज असण्याबद्दल फार पूर्वी कॉलेजच्या दिवसांत ऐकले होते.अर्थात ही कोणाच्या सुपीक डोक्यातून जन्मलेल्या कल्पनेतून उद्भवलेली लोणकढी असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही, परंतु कथाबीजात दम आहे एवढे मात्र निश्चित म्हणावेसे वाटते.
थोडक्यात काय, सगळे सापेक्ष आहे.