थोडक्यात काय, सगळे सापेक्ष आहे
अगदी सहमत!
जी. एंच्या प्रवासी कथेतला हा उतारा पाहा :
"मी दक्षिणेत प्रवास करताना तिथल्या एका वन्य जमातीत काही काळ राहिलो. या जमातीतील लोक नरमांस खात, पण अत्यंत क्षुद्रानेही मेंढीला किंवा कोंबडीला हात लावला नसता. त्यांच्यात मी काही दिवस तरी सुखानं राहू शकलो असतो, पण आपल्यात माणसं मेली की आपण त्यांची प्रेते जाळून टाकतो, असं मी एकदा सहज बोलून गेलो. ते ऐकताच काठ्या -दगड घेउन ती माणसे माझ्या मागे धावली. मला हाकलून लावताना त्यांचा नायक म्हणाला ' तू कुठल्या रानटी माणसातून आला आहेस कोणास ठाउक! स्वतःच्या प्रेमाच्या माणसांना ओंडक्याप्रमाणे जाळून टाकणे ह्या पेक्षा जास्त निर्दय प्रकार असणं शक्य नाही. आम्ही आमच्या माणसांची प्रेतं एका मोठ्या झोपडीत जपून ठेवतो, मांस विरेल तसे ते काढून टाकतो आणि मग स्वच्छ सांगाडे सदैव आमच्यात राहतात. तेव्हा तू चालता हो! तुझ्यासारख्या असंस्कृत, निर्दय जनावराला आमच्यात जागा नाही!' "
तात्पर्य : अंगणातला गुण परसात देखिल गुणंच ठरेल असं नाही.
जी. ए. कुलकर्णी
कथा : प्रवासी
कथासंग्रह : रमलखुणा