बुद्धी, विचार ... शब्द राहुद्या बाजुला. मूळ मुद्द्याकडे वळू.

इंग्लंड मधले लोक स्वतःला अजूनही भारी समजतात. त्याला कारण आहे. शेकडो वर्षांचे सामाजिक, राजकीय स्थैर्य. त्यातूनच विचारवंत वगैरे जन्माला येतात. राहणीमान, मॅनर्स, चांगलं-वाईट, चूक-बरोबर ह्या गोष्टी ठरत जातात. त्याची परिमाणं ठरत जातात. आणि ह्या गोष्टी वर्षांनुवर्ष टिकून राहतात. आता ह्यातून 'आमचंच बरोबर' अशी मानसिकता जशी तयार होऊ शकते, तशीच, सहसा बुद्धिभेद न होणारी एक, हवंतर विचारांची म्हणा, बैठक तयार होते. पुण्याच्या बाबतीत हे थोडफार लागू पडतं.

आता मुंबईला सामाजिक स्थैर्य नाहीच. सांस्कृतिक आघात चालूच आहेत. पुलंनी म्हटल्याप्रमणे मुंबईला भुतकाळ वगैरे नसतोच, असतो तो फक्त वर्तमान आणि भविष्य. आता ज्यांना भूतकाळाशी घेणंदेणं नाही, अश्या लोकांमध्ये 'बैठक' वगैरे कुठून येणार? पडताळून बघायला जूनी परिमाणंच नसतील तर अशी बैठक नसणारच. अशी लोकं निर्णय घेताना, मत व्यक्त करताना कधीतरी क्वचितप्रसंगी विचित्र बोलून/करून जातात. (त्यामध्ये वैचारिक तारतम्य नसते. )

दुसरी गोष्ट, तुमच्या प्रतिसादाच्या 'विषया' मध्ये तुम्ही लिहिलेली स्मार्टनेसची परिभाषा/व्याख्या ही खरोखरच तुम्हाला तशी वाटत असेल तर मला वाटतं हाच मोठा फरक आहे पुणे आणि मुंबईमध्ये.