ही कल्पनाही मला कशीशीच  वाटते. ह्यापेक्षा भूक लागेल तेव्हा अन नेमके खावे हाच उपाय सर्वार्थाने योग्य वाटतो. शेवटी आहार जितका वाढवू तितका वाढतो अन कमी करावा तितका करता येतो. दिवसातून जास्त वेळा खावेसे वाटत असेल तर ते विभागून अन छोट्या प्रमाणात खावे. इतकेच खाऊन मला तृप्त वाटते हे वारंवार मनाला पटवावे, थोड्या दिवसांमध्ये ही भावना यशस्वी रित्या जागते.

तरिही हे जमते का म्हणून प्रयत्न केला, पण कठीण आहे. एकतर जन्माल्यापासून आपल्याला गिळण्याची क्रियाच माहीत आहे. नुसतेच अन्न नव्हे, अपमान, दुःख, वगैरे. अन काही गोष्टी आपल्याला गिळून टाकतात, एकटेपणा, उदासीनता, विवंचना, स्वार्थ, इत्यादी. तर ह्या सवयीमुळे चघळून टाकून देताना बरेचसे आधीच गडप झालेले असणार. दुसरे असेही वाटले, चकली चघळणार म्हणजे त्यातला रस तर पोटात जाणारच ना? म्हणजे तेलही जाणार. मग ह्याचा उपयोग कसा होणार? गोड पदार्थ खायला ज्याला मनाई आहे त्याच्या पोटात साखर जाईलच की ह्या प्रकारात. आता रसही जाऊ द्यायचा नसेल तर ही कसरत करूनच इतके दमायला होईल की कमी खाल्लेले बरे याकडे कल आपोआप वळेल.