उत्तम ओळ व उत्तम मतला. अत्यंत साध्या शब्दात अतिशय अनेकविध अर्थांनी नटलेला आशय!
अभिनंदन!
आपल्या रचनांचा मी आधीपासूनच चाहता आहे. त्या भावनेस आणखी बळ देणारी रचना!
काही काही ओळी एकदम घुसणाऱ्या - जसे उंबरे बेजारसे!
निर्जीव गोष्टींना मन प्रदान करून त्यांच्याकडून आपल्या मनातील व्यथा बोलून घेणे ही गझलकाराची नुसती एक जबाबदारीच नाही तर खासियत पण आहे. ती या गझलेत फार सहजपणे सांभाळलेली दिसते.
उदाः - भिंत ओली, बिंब शोधी आरसे, वाट चुकले कवडसे!
उत्तम!