या दोघांच्या बाबतीत ही चर्चा चाले, हे मी प्रथमच ऐकतोय. असेल ही! पण माझ्या दृष्टीने दोघे ही अत्युच्च शिखरेच!

दोघांना एकाच विषयावर लिहायला सांगितले तर? असा एक प्रश्न भूषण कटककरांनी उपस्थित केला आहे. योगायोगाने कुसुमाग्रज आणि ग. दि. मा. यांनी एकाच विषयावर लिहलेल्या दोन कविता मला माहित आहेत. त्यांची येथे आठवण होते. त्यातील कोणती सरस आणि कोणती निरस हे ठरवणे माझ्या बुद्धीपलिकडील.

१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले त्या वेळी कुसुमाग्रज लिहतात- 

बर्फाचे तट पेटूनी उठले, सदन शिवाचे कोसळते,

रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!

अशा घडीला कोण करंटा तटस्थेतेने दूर पळे?

याच विषयावर ग. दि. मा लिहतात. -

परचक्र येतसे जेव्हा, चौदांची एकच जिव्हा!

हे कोटिकोटी भूजदंड, होतील इथे ध्वजदंड!

छातीची करूनी ढाल लाल, संगिनीस भिडवू!

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू!!

माझे दोघांच्याही प्रतिभेस अनंत प्रणाम!