ही कल्पना कशीशीच वाटण्यापेक्षाही हा उपाय सर्वस्वी चुकीचा आहे हे याआधी कोणी म्हणताना दिसले नाही.
चकली चघळणार म्हणजे त्यातला रस तर पोटात जाणारच ना? म्हणजे तेलही जाणार. मग ह्याचा उपयोग कसा होणार? गोड पदार्थ खायला ज्याला मनाई आहे त्याच्या पोटात साखर जाईलच की ह्या प्रकारात. आता रसही जाऊ द्यायचा नसेल तर ही कसरत करूनच इतके दमायला होईल की कमी खाल्लेले बरे याकडे कल आपोआप वळेल.
सहमत आहे. इतकी कसरत करण्याची मानसिक क्षमता असणारी व्यक्ती अपायकारक पदार्थ खाण्याच्या भानगडीत पडेल असे वाटत नाही आणि जे पडतात ते पदार्थातील रस शोषल्याशिवाय थुंकणार नाहीत. ही कसरत करून दमायला होईल असे नाही तर नैराश्य, अतृप्ती इ. भावनाही दाटून येतील. अन्यथा, पान आणि तंबाखू चघळून आणि नंतर थुंकून किंवा सिग्रेट ओढताना तिचा धूर बाहेर सोडून लोकांना घसा, स्तन, फुप्फुसांचे कर्करोग न होते.
अगदी, च्युइंगगमही शुगर-फ्री याच कारणासाठी बनवलेले असतात.
लेखकाचे वय या लेखातून स्पष्ट होत नाही परंतु अनेक व्याधींनी त्रस्त किंवा टाईप-२ डाएबिटीस असणारी अनेक लहान मुले असतात. त्यांना बालपणापासूनच किती पथ्य पाळावे लागत असेल त्याची कल्पना करावी. अशा मुलांमध्ये थोडा वेळही व्यतीत करावा कदाचित इतरांचे दुःख पाहून आपल्या दुःखाची संहती कमी होईल.