शु.म.
भुकेचा आणि खाण्याचा दूरान्वयाचा संबंध असतो. (खरे तर, अन्वय=संबंध. त्यामुळे ही पिवळ्या पितांबरासारखी टॉटॉलॉजी असली तरी इथे वापरल्यावाचून राहावत नाही. )
हे वाक्य लिहीताना आपण 'भुकेचा आणि खाण्याचा (अगदी) दूरचा संबंध असतो.' असं ही लिहू शकला असता पण तसं न करता , 'भुकेचा आणि खाण्याचा दूरान्वयाचा संबंध असतो.' असं लिहून काय सांगू ईच्छीता? कारण त्या वाक्या लागोलाग तुम्ही परत (खरे तर, अन्वय=संबंध. त्यामुळे ही पिवळ्या पितांबरासारखी टॉटॉलॉजी असली तरी इथे वापरल्यावाचून राहावत नाही. ) हे स्पष्टीकरण ही लिहीता ते कशासाठी? कृपया, ते ही आपण सांगावे.
'दुरान्वये' ह्या शब्दाचा वापर नकारात्मक वाक्य रचनेत केलेला आतापर्यंत मी पाहीलेला व एकलेला आहे.