आता ज्यांना भूतकाळाशी घेणंदेणं नाही, अश्या लोकांमध्ये 'बैठक' वगैरे कुठून येणार? पडताळून बघायला जूनी परिमाणंच नसतील तर अशी बैठक नसणारच. अशी लोकं निर्णय घेताना, मत व्यक्त करताना कधीतरी क्वचितप्रसंगी विचित्र बोलून/करून जातात. (त्यामध्ये वैचारिक तारतम्य नसते. )
हाहाहा! यापेक्षा विनोदी वाक्य मिळायचे नाही.
पु. ल. देशपांडे - मुंबईत जन्मलेले, राहिलेले - वैचारिक बैठक शून्य.
दादासाहेब फाळके, आचार्य अत्रे, व्ही. शांताराम - कर्मभूमी मुंबई - वैचारिक बैठक शून्य.
मृणाल गोरे- मुंबईकर - वैचारिक बैठक शून्य
हिंदूहृदयसम्राट बाळ ठाकरे - मुंबईकर - वैचारिक बैठक शून्य.
रतन टाटा - मुंबईकर - वैचारिक बैठक शून्य.
सुनील गावस्कर - मुंबईकर - वैचारिक बैठक शून्य.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी - वैचारिक तारतम्य नाही.
आणि अशी अनेक क्षेत्रातील अनेक माणसे मुंबईत मिळतील जी मत व्यक्त करताना कधीतरी क्वचितप्रसंगी विचित्र बोलून/करून जातात. (त्यामध्ये वैचारिक तारतम्य नसते. ) त्यात आता पु.लंचीही गणती करता आली. या तारतम्या अभावीच ते -
मुंबईला भूतकाळ वगैरे नसतोच, असतो तो फक्त वर्तमान आणि भविष्य.
मुंबईला कोणी एक भिकार म्हटले तर मुंबईकर त्याला सात भिकार म्हणतो अशी सेन्सलेस वाक्ये म्हणून गेले असावेत.