मी मुंबईचा आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीत जास्तवेळे अडकून पडणं अजिबात आवडत नाही. जेव्हा जे करायचं ते उत्स्फुर्तपणे व पुर्ण जोमाने. जोवर ती गोष्टीत करण्यातून आनंद वा ज्ञान मिळत असेल तोवर ती करायची. जेव्हा ह्या गोष्टीतून ते मिळणार नाही तेव्हा त्यापासून दूर होण, स्वतःला अलिप्त करून घेणं हेच योग्य वाटतं. प्रियाली यांनी हा चर्चा प्रस्ताव 'हास्स्यास्पद' आहे. असं मत मांडलं तिथंच हा चर्चा विषय संपला, मेला. आणि म्हणून मी ह्या चर्चेतून माघार घेत आहे.

स्मार्टनेसची परिभाषा पूण्याच्या लोकांना माहीत नाही. आणि म्हणूनच आपल्याला जे सांगायचे आहे हे सांगण्यासाठी त्यांना जागोजागी पाट्या लावाव्या लागतात ही गोष्ट मला उमजली. खरं बोललं तर समोरचा कानाखाली आवाज काढेल वा त्याच्याशी मारामारी करावी लागेल ह्या भीतीनेच पूण्यात पाट्या लावाव्या लागतात. किती वाईट गोष्ट आहे ही!

आई आपल्या तान्हुल्याला 'चंदोमामा' दाखवतच त्याच्या चिमुकल्या तोंडात इवले-इवले  घास भरवते. तो चंद्र त्या तान्हुलाचा अजिबात मामा-बिमा नसतो. तो एक ग्रहच असतो. तरीही ती आई गोड-गोड खोटं बोलतेच.

प्रियकर आपल्या प्रियसीला पुर्णिमेच्या चंद्राची उपमा देत, तिची खोटी-खोटी (का होईना) तारीफ करत तिच्या नाजुक ओठांमधून आपल्या ओठांनि प्रेमरस पाजतोच.

ज्यांना गोड-गोड खोटं बोलता येत नाही त्यांना काय म्हणायचं हे चक्रपाणी यांनी लिहीलेलच आहे.

या प्रतिसादा द्वारे मी ह्या चर्चेतून माघार घेत आहे.